मगील लेखात आपण आपल्या सूर्यमालेचा जन्म कसा झाला ते पाहिले.आत्ता आपण आपल्या ग्रहमालेविषयी माहिती पाहूया.
प्रथम सूर्याची माहिती पाहू.
सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा प्रमुख तारा. या सूर्याभोवतीच आपली ग्रहमाला फिरते.
सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला तारा. या सूर्यामुळेच आपल्या पृथ्वीवरील सजीवांस जगण्यास अवश्यक उर्जा मिळते.
सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला तारा. या सूर्यामुळेच आपल्या पृथ्वीवरील सजीवांस जगण्यास अवश्यक उर्जा मिळते.
आपल्या सूर्यमालेतील सर्वात अत्यवश्यक घटक असलेला सुर्य सर्वच बाबतीत प्रचंड मोठा आहे. सूर्याचा आकार आपल्या पृथ्वीच्या मानाने खुप मोठा आहे, साधारणपणे सूर्याच्या व्यासावर १०९ पृथ्वी राहू शकतील. थोडक्यात सूर्याचा व्यास साधारणपणे १३,९२,००० कि. मी. एवढा आहे.
सूर्यावर प्रामुख्याने हायड्रोजन व हिलीयम वायू आढळतात। सूर्यावर दर सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायूचे जळून हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते.
सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान ६००० अंश सेल्सीअस व गाभ्यातील तापमान सुमारे १,६०,००० अंश सेल्सीअस इतके आहे.
2 comments:
खूप छान छाया चित्र अन् माहिती पूर्ण पण आटोपशीर लेख , अभिनन्दन !
सुदेश रा. धोत्रेजी
मला आपला ब्लाँग आपले आकाश आवड्ला.
मला खगोलशास्त्रात खुप ईटंरेस्ट आहे. मला घरी
दूर्बीण बनवायची आहे माहिती असल्यास कळवावे.
तसेच आपण आकाश निरिक्षणासाठी कोणते माध्यम
वापरतात ते सांगावे.
बरेच काही बोलू कारण खगोलशास्त्रात आवड आहे.
प्रा.सचिन दिनकर पाटील
visit my:http:sachinpatil123.blogspot.com अभिप्राय कळवा
e-mail:sahu43@gmail.com
Post a Comment