Saturday, June 9, 2012
Monday, October 25, 2010
चंद्रावर पाणी!!!
चंद्रावर पाण्याचा अंश आहे या वैज्ञानिकांच्या दाव्याला वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत लगोलग चंद्रावर पाण्याचा मुबलक साठा असून तेथे स्वतंत्र पाणी प्रक्रिया असल्याचा दावा नासाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. यामुळे चंद्रावर पाणी असल्याचा वैज्ञानिकांचा दावा योग्य ठरला आहे असे वाटते.चंद्रावर मोठ्याप्रमाणावर रासायनिक हालचाली होत असल्याचे नासाच्या ‘लुनार कार्टर ऑब्झर्वेशन अॅण्ड सेन्सिंग सॅटेलाईट’ आणी ‘लुनार रिकोनेन्स ऑर्बिट’ या दोन उपग्रहांद्वारे केलेल्या अभ्यासातून दिसून आले. चंद्रावरील हे पाणी काही भागात प्रामुख्याने बर्फाच्या स्वरुपात आढळले. या सर्व गोष्टी कायम अंधारात असणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर असल्याचे नासाचे मुख्य लुनार वैज्ञानिक मायकल वागोर यांनी सांगितले. सध्याचा अभ्यास केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की चंद्रावर बर्फाचे खडक आहेत म्हणजे तेथे नक्किच पाण्याची स्वतंत्र अशी पद्धती असणार किंवा तेथे तो एक रासायनिक हालचालींचा परिणाम असेल. यापुढे नासा चंद्रावर हे बर्फाचे खडे कोठे आहेत, तेथे पाणी कसे आले आणि त्या पाण्याचे बर्फ तयार होण्याची नेमकी पध्दत कशी आहे या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे।
- सौजन्य महाराष्ट्र टाईम्स आणी नासा
Tuesday, September 28, 2010
दिलगिरी
सुदेश रा. धोत्रे.
आपले आकाश
Monday, September 27, 2010
गुरु दर्शन

हे छायाचित्र गुरु ग्रहाचे आहे. सोबतचे छायाचित्र श्री. अमोल र. भाईंदरकर यांनी नेरुळ - जुईनगर, नवी मुंबई येथून एपीटेक डीव्ही-६८ या ८ मेगा पिक्सेलच्या डिजिटल कॆमेराने दिनांक २१ सप्टेंबर २०१० रोजी रात्री ११.०० वा. ५ इंची रिफ्ल्याक्टर टेलिस्कोप मधून टिपले आहे. हे छायाचित्र टिपताना वातावरण ढगाळ तसेच पावसाळी असल्यामुळे बराच वेळ लागला.
आकाशगंगा २
आकाशगंगा - १
Thursday, August 14, 2008
दिनांक १ ऑगस्ट २००८ चे खग्रास सुर्यग्रहण
हे सुर्यग्रहण संध्याकाळी ४.२७ मिनिटांनी सुरु झाले आणि संध्याकाळी ६.०२ वाजेपर्यंत होते.हे विलोभनिय सुर्यग्रहणाचे छायाचित्र श्री. अमोल भायंदरकर यांनी जुईनगर, नवी मुंबई येथुन घेतले.
तसेच आत्ता दिनांक १६ ऑगस्ट २००८ चे चंद्रग्रहण रात्रॊ ११.०० वाजता पहायला विसरु नका.




