धूमकेतू ओळखणे तर फारच सर्वात सोपी गोष्ट आहे. धूमकेतूने साधारणपणे सूर्यमालेत प्रवेश केला की आपल्याला धूमकेतूची शेपटी दिसते. या शेपटीमध्ये बर्फाच्छादित धुळीकण असतात.धूमकेतू जसजसा सूर्याच्या जवळ यायला लागतो, त्यावेळी हे बर्फाच्छादित धुळीकण वितळून धूमकेतू पासून वेगळे होतात आणि या धुळीकणांची एक शेपटी तयार होते. धूमकेतू जसजसा सूर्यापासून दूर जात जातो तशी त्याची शेपटीसुद्धा दिसेनाशी होते. हे धूमकेतू आपणास जेव्हा मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करतात तेव्हापासून ते दिसावयास लागतात.
वर दिलेल्या छायाचित्रातील ग्रहांवर क्लिक केल्यावर त्या ग्रहांची माहिती मिळेल.