नेपच्यून हा सूर्यमालेतील आठवा ग्रह. हा ग्रहसुध्दा दुर्बिणीशिवाय दिसत नाही. नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९४६ रोजी लागला. नेपच्यून हा युरेनस ग्रहाच्याही पूढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. नेपच्यूनचे सूर्यापासूनचे अंतर साधारणत: ४,४९८,२५२,९०० कि. मी. एवढे आहे व त्याचा व्यास साधारणत: ४९,५२८ कि. मी. एवढे आहे.नेपच्यूनला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: १६५ वर्षे लागतात.
अंतराळयानाने पाठवलेल्या माहितीप्रमाणे नेपच्यून ग्रहाभोवती देखील कडे आढळून आले आहे. परंतु इतर ग्रहांच्या कड्यांप्रमाणे हे कडे गोलाकार नसून घोड्याच्या नालेसारखे वाटते. ही कडी दुर्बिणीतून दिसत नाहीत.
नेपच्यून ग्रहावर मिथेन या विषारी वायूचे बनलेले आहे.
नेपच्यून ग्रहाला एकूण ११ चंद्र आहेत.
