Monday, June 16, 2008

युरेनस

युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह. शनी ग्रहानंतरचे इतर ग्रह आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत ते पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासते. ह्या ग्रहा शोध विल्यम हर्षल यांनी १३ मार्च १७८१ रोजी लावला. युरेनस ग्रहाला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास १६ तास लागतात. व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ८४ वर्ष लागतात.
युरेनस सूर्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रदक्षिणा करत असला तरी तो स्वत:भोवती मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रदक्षिणा पूर्ण करतो. युरेनसचा व्यास साधारणत: ५१,११९ कि. मी. एवढा आहे.
युरेनस त्याच्या आसाभोवती ९८ अंशांनी कललेला असलेल्यामुळे तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. यामुळे कधी कधी युरेनसच्या ध्रुवाचे तर कधी कधी विषुववृत्तीय भाग दिसतो.
युरेनसला देखील शनी ग्रहाप्रमाणे कडे आढळले आहे पण ही कडा दुर्बिणीतून दिसत नाहीत. ही कडा युरेनसच्या केंद्राभागापासून ५०,००० कि. मी. अंतरावर आहे.
युरेनस ग्रहाला एकूण १५ चंद्र आहेत.
युरेनस ग्रह आपल्या कक्षेवरुन दर सेकंदाला एक मैल सरकतो. तसेच युरेनसभोवती देखील चुंबकीय क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

आपण सातत्याने बॉग वर ही सारी बहुमोलॊ माहीती आम्हाला का बर देत नाहीत ?

सुदेश रा. धोत्रे said...

काही अपरीहार्य कारणामुळे आम्ही आपणास खगोल शास्त्रासंबंद्धी माहिती पुरवू शकलो नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच या पुठे आपणास खगोलविषयक उपयुक्त माहिती पुरवण्याचा प्रयत्न करु.

सुदेश रा. धोत्रे.

आपले आकाश