आपली पृथ्वी शुक्र ग्रहानंतर सूर्यमालेतील तिसरा ग्रह. आपली पृथ्वी एक संपूर्ण विश्वामधील जीवसृष्टी असलेली एकमेव ग्रह आहे. पृथ्वीला निळा ग्रह सुध्दा म्हणतात.पृथ्वीचा व्यास १२,७५६ कि. मी. एवढा आहे, व सूर्यापासून पॄथ्वीचे अंतर साधारणपणे १४९,५९७,८९० कि. मी. एवढे आहे.
पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या आसाभोवती २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वत:भोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतूचक्र सुरु असते.
आपल्या पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात. पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली नसती, तसेच पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण व सूर्यापासूनचे ठराविक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच आपल्या पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली असावी.
पृथ्वीला एक उपग्रह आहे तो म्हणजे आपला चंद्र.
1 comments:
बॉग फार माहीतीपुर्वक आहे. मी श्री सुरेश परांजपेंचा स्नेही, त्यांच्या बरोबर वांगणीला आकाश निरीक्षणाला जात असे.
Post a Comment