शुक्र आपल्या सूर्यमालेतील बुध ग्रहनंतरचा दुसरा ग्रह. हा आकाराणे आपल्या पृथ्वीएवढाच आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील आंतरग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो.या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमात परावर्तित होतो. म्हणुन शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.
शुक्राला स्वत:भोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पुर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. तसे बघितले तर शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.
शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८,२०८,९३० कि. मी. एवढे आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह एकसारख्याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पुर्वेकडे या दिशेने फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह पुर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो.
शुक्र हा देखील आंतरग्रह असल्यामुळे याचेसुध्दा सूर्यावरील अधिक्रमण आपणास पहावयास मिळते.
शुक्राला देखील एकही चंद्र नाही.
2 comments:
नमस्कार,
आपला हा उपक्रम फ़ारच छान आहे.
मोरपीसकर
नमस्कार,
मला आपला ब्लॉग गुगलच्या सर्चिंगमध्ये मिळाला आणि त्याला वाचून कमेंट लिहण्याचा मोह आवरला गेला नाही.
Post a Comment